शुभवर्तमान, सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शंभर टक्के लसीकरण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाची मोहीत तीव्र केली आहे. या मोहीमेला चांगले यशही मिळत आहे. देशातील सहा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील शंभर टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. येथील सर्व नागरिकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे.Good news, one hundred percent vaccination in six states and union territories

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली. लसीकरण मोहीमेतील त्यांनी यशाबद्दल राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि आरोग्य कर्मचाºयांचे अभिनंदन केले.



सर्व पात्र प्रौढांना लस देणाºया पहिल्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशाचा समावेश आहे. इतर राज्यांमध्ये गोवा आणि सिक्कीम तर दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लडाख आणि लक्षद्वीप हे तीन केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे लसीकरण झालेले आहेत.

मांडवीय यांनी केलेल्या ट्विटमध्ये मम्हटले आहे की, प्रौढ लोकसंख्येच्या १०० टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्याबद्दल या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अभिनंदन. या क्षेत्रांतील आरोग्य कर्मचाºयांच्या परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल विशेष कौतुक. भारताने आत्तापर्यंत किमान ५६५ दशलक्ष म्हणजे ५६. ५ कोटी कोविड लस डोस दिले आहेत.

सप्टेंबर महिना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात महत्वाचा ठरला आहे. या काळात कर्नाटकमध्ये १ कोटी ७० लाख डोस देण्यात आले. सिक्कीममध्ये पाच लाख १० हजार कोविड -19 लसीचे डोस देण्यात आले आहेत. दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये ६ लाख २६ हजार, गोव्यात ११ लाख ८३ हजार डोस वितरीत केले गेले आहेत.

लक्षद्वीप सर्व प्रौढांना कमीत कमी एक डोस देऊन लसीकरण केले आहे. 29 ऑगस्ट रोजी कमीतकमी एका डोससह सर्व प्रौढांना लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले. गोवा राज्याने दोन दिवसांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी हा टप्पा गाठला.

Good news, one hundred percent vaccination in six states and union territories

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात