भारतीय निर्यातीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. भारतीय निर्यात ७.०४ बिलीयन डॉलर्स म्हणजे सुमारे ५० हजार कोटीवर पोहोचली आहे. गेल्या याच काळात ३.९१ बिलीयन डॉलर्सची निर्यात झाली होती.Good day for exports, 80 per cent increase in exports in the first week of May
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय निर्यातीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. भारतीय निर्यात ७.०४ बिलीयन डॉलर्स म्हणजे सुमारे ५० हजार कोटीवर पोहोचली आहे. गेल्या याच काळात ३.९१ बिलीयन डॉलर्सची निर्यात झाली होती.
याच काळात भारता होणारी आयातही ८०.७ टक्यांनी वाढली आहे. भारताने ८.८६ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षी याच काळात ही आयात ४.९१ बिलयन डॉलर्स होती.
एप्रिल महिन्यात भारताने ३०.२१ बिलीयन अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. गेल्या वर्षीपेक्षा निर्यातीत तीन पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षीची याच काळातील निर्यात १०.१७ बिलीयन डॉलर्स होती.
हिरे आणि दागिने, जुट, कारपेट, हस्तकलेच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तेलबिया, बदाम, इंजिनिअरींग उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने आणि केमिकल्सची निर्यात वाढली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑरगनायझेशनचे अध्यक्ष एस. के. सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर निर्यातीच्या ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे निर्यात क्षेत्र दमदारपणे वाटचाल करत आहे. सरकारने निर्यातीभिमुख धोरणांचा अवलंब केल्यास निर्यातीमध्ये आणखी वाढ होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App