विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला पाचशे वर्षांत प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आला. अयोध्येतील रामजन्मोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला.Gold mukut for Ramlalla in ayodhya
मात्र, तो गाजला तो तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यामुळे.१९९२ पासून रामलल्लाच्या मूर्तीसाठी चांदीचा मुकुट वापरला जात होता.
आता रामलल्लासह इतर तिघा भावांच्या मूर्तींनाही शुद्ध सोन्याचा मुकुट घालण्यात आला आहे. या मुकुटांची किंमत ११ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.दरवर्षी अनेक प्रतिष्ठीत नेत्यांच्या आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा
रामजन्मोत्सव यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडक लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मात्र, रामलल्लाला शरयू नदीच्या पाण्याने आंघोळ घालून नंतर सर्व नेहमीची विधीवत पूजा पार पाडली गेली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App