अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मदतीचा ओघ, मनसे, राष्ट्रवादीच्या आमदाराकडून निधी


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी सर्व थरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध पक्षांची नेतेमंडळीही यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी देणगी दिली आहे. Funds from MNS NCP MLAs for construction of Ram temple in Ayodhya

आयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी राममंदिर निधी समर्पण अभियानास नुकतीच देशभर सुरुवात झाली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांची देणगी दिली. राम मंदिराच्या उभारणीत खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य लाभले आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही राम मंदिरासाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली आहे. अतुल बेनके आणि परिवाराच्या वतीने ही देणगी मंदिरासाठी दिली आहे.

Funds from MNS NCP MLAs for construction of Ram temple in Ayodhya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती