गोवा फॉरवर्ड ब्लॉक एनडीएमधून बाहेर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाहयांना पत्र लिहून हे जाहीर केले आहे.Goa forward block party out from NDA


विशेष प्रतिनिधी 

पणजी  : गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाहयांना पत्र लिहून हे जाहीर केले आहे.

भाजप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्या गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपच्या सरकारवर अनेक आरोपही केले होते. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील गोवा सरकारचे अनेक निर्णय हे अँन्टी गोवा धोरणाला खतपाणी घालणारे आहे.हा प्रकार म्हणजे गोव्याच्या जनतेबरोबर केलेला अविश्वास आहे. सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी लावला आहे.भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचे सांगताना सरदेइाई म्हणाले,

जुलै 2019 पासून राज्यातील नेतृत्वाने गोव्यातील जनतेकडं पाठ फिरवली आहे. लोकांना विकासाची अपेक्षा होती पण की अपेक्षा फोल ठरली. पर्रिकर यांच्या दुदैर्वी निधनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले

आणि राज्यात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू झाला. सामान्य गोवेकरांचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला नाही. गोव्यातील अनोखी जीवनशैली, येथील समृद्ध वारसा, पर्यावरण आणि जीवनमान यालाच धोका निर्माण झाल्याचंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

गोवा फॉवर्ड पक्षाने 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधी भूमिका घेत निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्यांच्या तीन आमदारांना पर्रिकरांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण पर्रिकरांच्या निधनानंतर या तिन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली.

Goa forward block party out from NDA