पंजाबमध्ये राजकीय भूकंपाचा रिश्टर स्केल वाढला; नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्यानंतर समर्थक मंत्री, पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे


प्रतिनिधी

चंडीगड – पंजाबमध्ये आज दुपारी झालेल्या राजकीय भूकंपाचा रिश्टर स्केल वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यापाठोपाठ दोन कॅबिनेट मंत्री रजिया सुल्तान आणि सिध्दू समर्थक प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र काँग्रेस श्रेष्ठींच्या दिशेने फेकले आहे.Gautam Seth resigns as General Secretary (in-charge training) of Punjab Congress

मुख्यमंत्री बदलून एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सारखा मुख्यमंत्री बदलला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांनीच आज दुपारी अचानक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला.

कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत पोहोचले आहेत. तर तिकडे नवज्योत सिंग सिध्दू यांनी तडकाफडकी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला.
पंजाबच्या हिताशी समझोता करणार नाही, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. पण काँग्रेसचा एकनिष्ठ सैनिक म्हणून काम करीत राहीन, असे नवज्योत सिंग सिध्दू यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

पण यानंतर कॅबिनेट मंत्री रजिया सुलतान, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा, कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल, दुसरे सरचिटणीस गौतम सेठ यांनी राजीनामे दिले आहेत.
बाकीच्या काँग्रेस आमदारांनी नवज्योत सिंग सिध्दू यांच्या तक्रारी काँग्रेस श्रेष्ठींनी ऐकून घ्याव्यात. त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे. पण पक्षातली ही बंडखोरी कमी होण्याऐवजी मुख्यमंत्री बदलल्यानंतर वाढल्याचेच दिसून येत आहे.

Gautam Seth resigns as General Secretary (in-charge training) of Punjab Congress

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण