‘सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या’, आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची पुण्यातील संघटनेची मागणी

give place to Sutar community among Brahmins, Pune-based organization demands cancellation of reservation and open category

Sutar community : आजकाल आरक्षणासाठी देशभरात विविध समाजाची आंदोलने, मोर्चे सुरू आहेत, परंतु पुण्यातील सुतार समाजाच्या एका संघटनेने थेट आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची मागणी केली आहे. या संघटनेच्या नेत्यांनी आमचे विचार प्रगत झाले असल्याने आमचं आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण समाजात घ्या, अशी मागणी केली आहे. पुण्यातील विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरुड व संजय भालेराव अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. give place to Sutar community among Brahmins, Pune-based organization demands cancellation of reservation and open category


विशेष प्रतिनिधी

पुणे : आजकाल आरक्षणासाठी देशभरात विविध समाजाची आंदोलने, मोर्चे सुरू आहेत, परंतु पुण्यातील सुतार समाजाच्या एका संघटनेने थेट आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची मागणी केली आहे. या संघटनेच्या नेत्यांनी आमचे विचार प्रगत झाले असल्याने आमचं आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण समाजात घ्या, अशी मागणी केली आहे. पुण्यातील विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरुड व संजय भालेराव अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

‘आरक्षण रद्द करून ब्राह्मण समाजात घ्या!’

‘दै. लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार या संघटनेचे विष्णु गरुड म्हणाले की, “सुतार समाज हा हिंदू धर्माच्या सर्व प्रकारच्या परंपरा, चालीरीती, व्रत, पूजा-पाठ नित्यनेमाने करतो. समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथांचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रुढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. आमचे विचार प्रगत झाले आहेत, त्यामुळे आमचे आरक्षण रद्द करून ब्राम्हण समाजात घ्या.”

यासाठी संघटनेचे विष्णू गरुड व संजय भालेराव यांनी नव्याने जनगणना करून सुतार समाजाला खुल्या प्रवर्गात घेण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय लवकरच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.

गरुड म्हणाले, की गेल्या ७० वर्षांतील आरक्षणाच्या लाभाने सुतार समाजातील बांधवांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. आज प्रत्येक जात समूह आरक्षण मागत आहे. मात्र, आरक्षणाचा लाभ घेणारे राष्ट्रहितासाठी व सामाजिक दायित्वासाठी मागे राहत आहेत. ‘राज्यात तसेच देशात सुतार समाजाच्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय संस्था, संघटना कार्यरत आहेत. त्या कधीही ‘फुले-शाहु-आंबेडकर’ या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत नाहीत. तसेच त्यांचे विचारही समाजात सांगत नाहीत. थोडक्यात म्हणजे सुतार समाज इतका प्रगत झाला आहे की, त्यांना महापुरुषांच्या विचारांची गरजच राहिली नाही.”

काय आहेत या संघटनेच्या मागण्या…

या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. यात व्यावसायिक कर्ज २ लाखांपर्यंत विनातारण, जमीनकी द्यावी. तालुका पातळीवर विश्वकर्मा औद्योगिक भवन उभारावे. ग्रामीण भागातील सुतार समाजाला घरबांधणीसाठी ५ लाखांचे कर्ज द्यावे. सामुदायिक विवाह सोहळ्यास अनुदान द्यावे. आंतरजातीय विवाह केल्यास प्रत्येक जोडप्यास प्रोत्साहनपर ५० हजार रूपये द्यावेत. सुतार विश्वकर्मीय समाजास रीतसर विश्वब्राह्मण म्हणून दर्जा द्यावा. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

पुण्यातील सुतार समाजाच्या या संघटनेने केलेल्या अनोख्या मागणीमुळे आता संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीचे स्वागत केले आहेत, दुसरीकडे, आरक्षण नाकारले तर समाजातील गरिबांनी काय करावे, असा सवालही केला जात आहे.

give place to Sutar community among Brahmins, Pune-based organization demands cancellation of reservation and open category

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण