रामलीलेतील श्रीरामालाच धमकी : पात्र साकारणारा मुस्लिम कलाकार दहशतीत, धर्मांधांच्या भीतीने पोलिसांत धाव, दानिशला खुद्द मुख्यमंत्री योगींचे पत्र

Yogi Sarkar called Muslim artist to Perform Ramleela in Ayodhya, Goons Threaten him not to Perform

Ramleela in Ayodhya : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बिनडोक तालिबानी विचारसरणीचे प्रकरण समोर आले आहे. येथे रामलीलेमध्ये श्रीराम आणि कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या दानिश खान आणि समियुन या दोन मुस्लिम कलाकारांना धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी धमकी दिली आहे. श्रीरामाचे पात्र साकारताना दानिश कपाळावर टिळा लावायचा. त्याच्या परिसरातील काही गुंडांनी याला आक्षेप घेतला. प्रथम त्यांनी रामलीलामध्ये काम न करण्यास सांगितले. दानिशने ऐकले नाही, तर गुंडांनी धमक्या दिल्या. Yogi Sarkar called Muslim artist to Perform Ramleela in Ayodhya, Goons Threaten him not to Perform


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बिनडोक तालिबानी विचारसरणीचे प्रकरण समोर आले आहे. येथे रामलीलेमध्ये श्रीराम आणि कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या दानिश खान आणि समियुन या दोन मुस्लिम कलाकारांना धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी धमकी दिली आहे. श्रीरामाचे पात्र साकारताना दानिश कपाळावर टिळा लावायचा. त्याच्या परिसरातील काही गुंडांनी याला आक्षेप घेतला. प्रथम त्यांनी रामलीलामध्ये काम न करण्यास सांगितले. दानिशने ऐकले नाही, तर गुंडांनी धमक्या दिल्या. या दोन्ही कलाकारांनी सोमवारी बरेलीचे एसएसपी रोहित सिंह सजवान यांच्याकडे या तक्रार केली आहे. पोलिसांनी चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

अयोध्येत रामलीलेसाठी मिळाली ऑफर

कलाकार दानिश म्हणाला, “जेव्हापासून तो रामलीलामध्ये काम करत आहे, तेव्हापासून त्याच्या घराशेजारचा खालिद नावाचा गुंड त्याला त्रास देत आहे. अनेक वर्षे त्याने सहन केले, पण आता खालिदने मर्यादा ओलांडली आहे. पुढील महिन्यात अयोध्येत रामलीला आयोजित करण्यासाठी सरकारने मला आमंत्रण दिले आहे. ही गोष्ट त्या गुंडाला कळली तेव्हा त्याने रामलीलामध्ये काम न करण्याचे फर्मान सुनावले. जर तू मुस्लिम असूनही रामलीले रामाचे पात्र साकारले, तर ते बरे होणार नाही, अशी धमकी दिली.

टिळा लावून घरी जायचा तेव्हा टोमणे मारायचे

दानिशने सांगितले की, तो 15 वर्षांपासून रंगभूमीशी संबंधित आहे. त्याने शेकडो नाटकांमध्ये अभिनय केला. तीन वर्षांपूर्वी त्याचे काम पाहून त्याला रामलीलामध्ये भगवान श्रीरामाची भूमिका करण्याची ऑफर मिळाली. मनापासून त्याने स्टेजवर भगवान श्रीरामाचे पात्र असे साकारले की लोक त्याचा अभिनय विसरू शकत नाहीत. यानंतर तो सतत रामलीलामध्ये भगवान श्रीरामाची भूमिका साकारत आहे.

कधीकधी उशीर झाल्यामुळे तो मेकअप आणि टिळा तसाच ठेवून घरी जात असे. तेव्हा त्याच्या कपाळावरील टिळा पाहून खालिद टोमणे मारायचा. अनेक वर्षे त्याने सहन केले, पण आता त्याने मर्यादा ओलांडली आहे. त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली आहे, अशी तक्रारही दानिशने केली.

अयोध्येतील रामलीला साकारण्यासाठी 17 जिल्ह्यांतील कलाकारांची निवड

दानिशने सांगितले की, पुढील महिन्यात अयोध्येत रामलीला आयोजित केली जाणार आहे. यासाठी 17 जिल्ह्यातील कलाकारांची निवड करण्यात आली आहे. तो बरेलीतून आहे. मिळालेल्या कॉल लेटरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव आहे. यानंतर थिएटर कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. तो त्याच्याच तयारीत व्यग्र आहे, पण धमकी मिळाल्याने संपूर्ण त्याचे कुटुंबीय चिंतित झाले आहेत.

Yogi Sarkar called Muslim artist to Perform Ramleela in Ayodhya, Goons Threaten him not to Perform

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण