विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा पाहुणचार केला. आम्ही क्रिकेट आणि हॉकीमध्ये एकमेंकांशी संघर्ष करत असलो तरी व्यापार आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर एकत्र आहोत.Gautam Adani hosts Former Australian PM,said conflict between us is only in Cricket and Hocky
अदानी यांनी नुकतेच ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी बॉट, भारताचे ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. याबाबत अदानी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन बुध्दीमत्तेचा उत्तम अविष्कार जेवणावेळी दिसला.
आम्ही क्रिकेट आणि हॉकीमध्ये एकमेंकांविरोधात आहोत. मात्र, आमचे व्यापारी संबंध चांगले आहेत. राष्ट्रीय हिताच्या गोष्टीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया सोबत आहेत.ऑस्ट्रेलिया च्या उत्तर क्वीन्सलँड इस्टेटमध्ये अदानी यांनी कोळशाच्या खाणी विकत घेतल्या आहेत. या प्रकल्पामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App