लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी अभिनेता दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दीप सिद्धू याचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या काळात आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. अलीकडेच तीस हजारी कोटार्ने त्याला जामीन मंजूर केला होता.Fwd: Accidental death of actor Deep Sidhu, accused in Red Fort violence case

पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात जाट शीख कुटुंबात जन्मलेल्या दीप सिद्धूचा वयाच्या ३१ व्या वर्षीच मृत्यू ओढवला आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात दीप सिद्धूने सक्रिय सहभाग नोंदवला होता. गेल्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती.हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत दाखल झाले होते. या परेडला लाल किल्ला परिसरात हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढत तेथे आपल्या धमार्चा झेंडा फडकावला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली होती. पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्यात ५०० पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते

तर एका निदर्शकाचाही मृत्यू झाला होता. दीप सिद्धू याच्यावर आंदोलकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला ९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. अलीकडेच तीस हजारी कोटार्ने त्याची जामिनावर सुटका केली होती. जामीन अर्जावरील सुनावणीवेळी दीप याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर येथे बॉलीवूड अभिनेता व खासदार सनी देओल यांच्या प्रचारात दीप सिद्धू सहभागी झाला होता. मात्र, डिसेंबर २०२१ नंतर या दोघांत काहीशी कटुता निर्माण झाली. सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात दीप याचा सक्रिय सहभाग होता. आंदोलनादरम्यान त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीप सिद्धू हा बिहारमार्गे नेपाळमध्ये जाणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती. मात्र , त्याआधीच त्याला पोलिसांनी अटक केली होती. खलिस्तानवाद्यांच्या सीख फॉर जस्टिस या संघटनेशी कनेक्शन असल्याच्या संशयावरूनही एनआयएने दीप सिद्धूला नोटीस बजावली होती.

Fwd: Accidental death of actor Deep Sidhu, accused in Red Fort violence case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण