अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे कल्याणसिंह गेले…!!


वृत्तसंस्था

लखनौ – अयोध्येतील राम मंदिरासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज रात्री निधन झाले. Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes away

ते लखनौच्या संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या ४४ दिवसांपासून दाखल होते. आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कालपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे एकेक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.



अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात उत्तर प्रदेशातून जे मोठे नेते उदयाला आले, त्यामध्ये कल्याण सिंह यांचे नाव सर्वांत वरचे होते. त्यांनी दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. एकदा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर तर एकदा भाजपच्या आणि अपक्षांच्या बहुमताच्या बळावर. १९९२ मध्ये बाबरी मशीदीच्या पतनानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला.

पण तेव्हाच्या नरसिंह राव सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार देऊन त्यांचे सरकार बरखास्त केले होते. पण अयोध्येतील कारसेवकांवर गोळी – लाठी चालवणार नाही, हे सुप्रिम कोर्टात त्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी अखेरपर्यंत पाळले. त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमावली पण करोडो रामभक्तांचा आणि कारसेवकांचा विश्वास संपादन केला.

नंतरच्या काळात भाजप नेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी काही काळ भाजपचा त्याग केला. पण २०१४ मध्ये ते स्वगृही परतले. त्यांना मोदी सरकारने नंतर राजस्थानचे राज्यापाल नेमले होते.

Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes away

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात