फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद; चंडीगडमधील हॉस्पिटलचा निर्वाळा

वृत्तसंस्था

चंडीगड – भारताचे प्रख्यात धावपटू स्प्रिंट मास्टर फ्लाइंग सिक्ख मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. त्यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाल्यामुळे ३ जून रोजी चंडीगडच्या पीजीआयएमइआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. Former Indian sprinter Milkha Singh, who was admitted to ICU of PGIMER Chandigarh

त्यांच्यावर तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचे निदान झाले आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवाच मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत फोन करून विचारपूस केली होती. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्यांच्या प्रकृतीचे सगळे पॅरामीटर्स सुधारलेले दिसत आहेत. असे डॉक्टरांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

Former Indian sprinter Milkha Singh, who was admitted to ICU of PGIMER Chandigarh

महत्त्वाच्या बातम्या