भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गुंडांनी कांबळीला एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीनुसार त्यांना प्रथम केवायसी अपडेट करण्याच्या नावावर कॉल आला, त्यानंतर त्यांनी कांबळीच्या खात्यातून 1,13,998 रुपयांची फसवणूक केली. Former Indian cricketer Vinod Kambli, a victim of fraud in the name of KYC update, police in search of the accused
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गुंडांनी कांबळीला एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीनुसार त्यांना प्रथम केवायसी अपडेट करण्याच्या नावावर कॉल आला, त्यानंतर त्यांनी कांबळीच्या खात्यातून 1,13,998 रुपयांची फसवणूक केली.
Mumbai: An FIR registered at Bandra Police Station, against unidentified person, based on a complaint by former cricketer Vinod Kambli of being duped of Rs 1,13,998 on the pretext of KYC update. (File photo) pic.twitter.com/CsNoQY1cWd — ANI (@ANI) December 10, 2021
Mumbai: An FIR registered at Bandra Police Station, against unidentified person, based on a complaint by former cricketer Vinod Kambli of being duped of Rs 1,13,998 on the pretext of KYC update.
(File photo) pic.twitter.com/CsNoQY1cWd
— ANI (@ANI) December 10, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ३ डिसेंबरचे आहे. कांबळीला फोन करणार्या व्यक्तीने स्वतःची ओळख एका खासगी बँकेतील कर्मचारी असल्याचे सांगितले. फोनवर बँक कर्मचारी बनलेल्या या भामट्याने त्यांना केवायसी अपडेट करण्यासाठी काही बँक तपशील देण्यास सांगितले आणि कांबळीच्या खात्याची माहिती मिळताच त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतले.
दरम्यान, तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी त्यांची मदत घेत पैशांचा व्यवहार पूर्ववत केला आणि कांबळी यांना त्यांचे पैसे परत मिळाले. त्याचवेळी आता पोलिसांनी तपास सुरू केला असून त्या खातेदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दुसरीकडे, पैसे परत मिळाल्याबद्दल कांबळीने सायबर पोलिसांचे आभार मानले आणि सांगितले की, “मी फोनवर कस्टमर केअर नंबरवर कॉल केला तसेच पैसे ट्रान्सफरचा संदेश आला आणि ते खाते ब्लॉक केले. त्यानंतर मी थेट सायबर पोलिसांकडे गेलो. सायबर पोलिसांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभारी असल्याचे कांबळी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App