मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!

वृत्तसंस्था

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातल्या दोन शहरांच्या दौऱ्यावर होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळमध्ये त्रिशूलच्या दौऱ्यावर होते, पण राजकीय भूकंप मात्र आंध्र प्रदेशात झाला आहे. माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

Former Andhra Pradesh CM Kiran Kumar Reddy resigns from the Indian National Congress party

कृपया काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा माझा राजीनामा स्वीकार करावा, अशा एका ओळीचे पत्र लिहून किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेस सोडली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार काँग्रेस सोडून ते लवकरच भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

किरण कुमार रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विश्वासू होते. राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असताना किरण कुमार रेड्डी हे आंध्र विधानसभेचे अध्यक्ष होते. परंतु राजशेखर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जगन मोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री न करता किरण कुमार रेड्डी यांना विधानसभा अध्यक्ष पदावरून पाय उतार करत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली होती.

परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसला उतरती कळा लागली. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण आणि आंध्र प्रदेश अशी दोन स्वतंत्र राज्ये झाली. या काळात किरण कुमार रेड्डी काही वर्षांसाठी अज्ञातवासतच गेले होते. आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते पुन्हा प्रकाशात आले आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकात मंड्या आणि हुबळी धारवाडच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी अनेक विकास कामांचे उद्घाटन केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी जाहीर सभा घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मोदी आणि शाह हे दक्षिणेतल्या दोन वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेस सोडल्याचा आंध्रमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हा निव्वळ राजकीय योगायोग असेल का?, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात