वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर‎ पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही


प्रतिनिधी

पुणे : संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे उद्घाटन पुढच्या होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.Good news for Warkaris Dehu-Alandi to Pandharpur palkhi road will be completed next year, Gadkari’s assurance that the road will be four-lane

गडकरी पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग 6‎ पॅकेजमध्ये असून 12 पालखी स्थळे‎ आहेत, तर संत तुकाराम महाराज‎ पालखी मार्ग तीन पॅकेजमध्ये असून‎ दोन्ही पालखी मार्गांचे काम जलदगतीने‎ करण्यात येत आहे. या मार्गावर 11‎ पालखी स्थळे आहेत. वर्षभराच्या आत‎ पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात‎ येईल. नवीन वर्षात सुरुवातीलाच‎ पालखी मार्ग वारकऱ्यांना उपलब्ध‎ होईल. या मार्गाचे पुढच्या 3 महिन्यांच्या आत 60‎ ते 70 टक्के काम पूर्ण होईल‎ आणि डिसेंबरअखेरीस सर्व कामे पूर्ण‎ होतील.



नितीन गडकरी म्हणाले, पालखी‎ मार्गावर दुपदरी रस्ता चौपदरी‎ करण्यात आलेला आहे. शेवगाव येथे‎ गजानन पालखी मार्गावर टाइल्स‎ लावून मध्ये गवत लावण्यात आले‎ आहे. त्यामुळे भाविकांचे पाय भाजत‎ नाहीत. अशाच प्रकारे या मार्गावर‎ व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे,‎ असेही गडकरी यांनी या वेळी‎ सांगितले.‎

गडकरींनी केली पालखी मार्गाची हवाई पाहणी‎

देहू व पंढरपूर या दोन‎ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना‎ जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज‎ पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री‎ नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत‎ सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह‎ शनिवारी हवाई पाहणी केली.

हा‎ महामार्ग ”हरित मार्ग ”करण्यात यावा या‎ दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना‎ करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन‎ गडकरी यांनी यावेळी संबंधित‎ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

श्रीसंत तुकाराम महाराज‎ पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग‎ पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती -‎ इंदापूर – अकलुज – बोंडलेपर्यंत‎ विकसित करण्यात येत आहे. या‎ मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून‎ वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व‎ ठिकाणी आवश्यक त्या सुविधा‎ उपलब्ध करून देण्यात येतील, असेही‎ गडकरी यांनी या वेळी बोलताना‎ सांगितले.‎

Good news for Warkaris Dehu-Alandi to Pandharpur palkhi road will be completed next year, Gadkari’s assurance that the road will be four-lane

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात