पहले मतदान फिर अन्य कोई काम : गोवा उत्तराखंड, उत्तर प्रदेशात पुढील पाच वर्षांचे भवितव्य लिखाण सुरू!!


वृत्तसंस्था

पणजी /डेहराडून : गोवा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील 55 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून मतदार राजा पुढच्या पाच वर्षांसाठी आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करतो आहे. एक प्रकारे पुढच्या पाच वर्षांचे भवितव्य आपल्या हाताने मतदार राजाला लिहितो आहे.First voting then any other work

गोव्यातील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये तसेच उत्तराखंडातील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये बरोबर 8.00 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून मतदार राजाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. “पहले मतदान फिर अन्य कोई काम” अशा टॅगलाईन पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हा आणि मतदानाचा विक्रम घडवा. आपला अधिकार बजावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

आजच्या मतदानात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीश रावत आदी दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.

उत्तर प्रदेशात देखील 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बदायूं, अमरोहा, बरेली, शहाजापूर या जिल्ह्यांमध्ये हे मतदार संघ विखुरलेले आहेत. प्रामुख्याने हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातो. यामध्ये समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांचा रामपूर मतदार संघ येतो. याखेरीज मुबारक अली यांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

सहारनपूर जिल्ह्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच मां शाकंभरी विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे. तसेच तेथे 500 बेड असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. सहारनपुर ते शहाजापूर हा सर्व पट्टा मधल्या काळात बुलडोजर राजकारणासाठी देखील प्रसिद्ध झाला होता. या पट्ट्यात योगी आदित्यनाथ सरकारने अनेक गुंड माफियांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्या बेकायदा हवेल्या, हॉटेल्स बुलडोजर चालवून उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे हा परिसर गुंड माफिया मुक्त केल्याचा दावा भाजपने केला आहे, तर समाजवादी पक्षाने याचे सामाजिक न्यायाचा मुद्दा लावून धरला आहे. आज समाजवादी पक्षासाठी या 55 मतदारसंघात “काँटे की टक्कर” निर्माण झाली आहे.

First voting then any other work

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात