FIR against Indigo Vistara Spice Jet and Air Asia : कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. देशात रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र आणि यूपीनंतर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. कोरोना महामारीमुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. यासाठी दिल्ली सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास किंवा नियम मोडल्यास काय कारवाई करण्यात येईल, याची झलकच केजरीवाल सरकारने दाखवली आहे. FIR against Indigo, Vistara, Spice Jet and Air Asia likely to Register by Delhi Govt
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. देशात रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र आणि यूपीनंतर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. कोरोना महामारीमुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. यासाठी दिल्ली सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास किंवा नियम मोडल्यास काय कारवाई करण्यात येईल, याची झलकच केजरीवाल सरकारने दाखवली आहे.
कुंभमेळ्यातून व महाराष्ट्रातून राजधानी दिल्लीत येणाऱ्यांनी आरटी-पीसीआर टेस्टचा नकारात्मक अहवाल आपल्यासोबत आणावा, असे स्पष्ट निर्देश दिल्ली सरकारने दिले होते. हा नियम मोडल्याबद्दल आता दिल्ली सरकारने इंडिगो, विस्तारा, स्पाइस जेट आणि एअर एशियाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलीस या विमान कंपन्यांविरुद्ध आता कायदेशीर कारवाईसाठी कायदेशीर सल्ला घेत आहेत.
Delhi Police have not registered FIR on the complaint of Delhi govt against 4 airlines. Police are seeking legal opinion on the matter: Delhi Police — ANI (@ANI) April 18, 2021
Delhi Police have not registered FIR on the complaint of Delhi govt against 4 airlines. Police are seeking legal opinion on the matter: Delhi Police
— ANI (@ANI) April 18, 2021
दिल्ली सरकारने इंडिगो, विस्तारा, एअर एशिया आणि स्पाइस जेटविरोधात ही कारवाई केली कारण या सर्व विमान कंपन्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली नव्हती. डीडीएमए कायद्यांतर्गत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत शनिवारी 24 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. राजधानीतील कोरोना परिस्थिती हरप्रकारे नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शनिवारी दिल्लीत कोरोनामुळे 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
FIR against Indigo Vistara Spice Jet and Air Asia likely to Register by Delhi Govt
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App