सरकारच्या चांगल्या कामांविषयी कमी लिहितो म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू काश्मीर प्रशासनाने सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो म्हणत एका २९ वर्षीय पत्रकाराविरोधात सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सज्जाद गुल असं या पत्रकाराचं नाव आहे. गुल असल्याने तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांना सरकारविरोधात भडकाऊ शकतो, असेही प्रशासनाने म्हटले आहे.Filed a crime against a journalist for writing less about the good work of the government

काश्मीरमधील केंद्रीय विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणारा विद्यार्थी सज्जाद गुल एका स्थानिक वृत्तपत्रात काम करतो. द कश्मीरवाला या वृत्तपत्रात काम करणाºया सज्जाद गुलला ६ जानेवारीला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली.



त्याच्याविरोधात पोलिसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्यानं गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार सज्जादने कारवाईत मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांचा भारतविरोधी घोषणा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे.

सज्जाद गुलविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आलेत. २ एफआयआर पोलिसांच्या तक्रारीवरून दाखल झालेत, तर एक गुन्हा स्थानिय तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल झाला आहे. बांदीपोरातील सुंबलमध्ये न्यायालयाने सज्जाद गुलला १५ जानेवारीला जामीन दिला.

मात्र, दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने त्याच्यावर पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला.प्रशासनाने गुन्हा दाखल करताना म्हटले आहे की, तुम्ही कायमच सोशल मीडियावर वादग्रस्त विधानं आणि ट्विट केलीत. एक पत्रकार म्हणून तुम्ही केंद्र शासित राज्य सरकारच्या चांगल्या कामांवर खूप कमी रिपोर्टिंग करतात.

तुम्ही शत्रुत्व आणि द्वेष पसरवत आहात. तुम्ही नेहमी राष्ट्र-विरोधी आणि असामाजिक ट्वीट करतात. केंद्र शासित प्रदेशाच्या धोरणांवर नकारात्मक टीका करतात. तुम्ही लोकांना सरकारविरोधात भडकावण्यासाठी तथ्यांची चाचपणी न करता ट्वीट करतात. तुम्ही दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तारणहाराप्रमाणे वर्तन करतात.

तसेच राष्ट्रीय हिताला बाधा पोहचेल असेच मुद्दे उपस्थित करतात. तुम्ही शिकलेले असल्याने सरकारविरोधात लोकांना भडकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तुमच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांनी शत्रुत्व आणि अराजकता पसरत आहे. कारण तुम्ही शिकलेले असल्याने काश्मीरच्या लोकांची दिशाभूल करणे तुमच्यासाठी सोपं आहे. तसेच तुम्ही लोकांना सरकारविरोधात सहजपणे भडकाऊ शकता.

Filed a crime against a journalist for writing less about the good work of the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात