FACT REVELED: त्रिपुरात काहीही घडलं नाही ! सोशल मीडियावरचं ‘ते’ वृत्त चुकीचं ; महाराष्ट्रातला हिंसाचार चिंताजनक ; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : त्रिपुरात जे घडल नाही त्यावरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे.अशातच आता अशी कोणतीही घटना घडली नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.FACT REVELED: Nothing happened in Tripura! ‘That’ news on social media is wrong; Violence worries Maharashtra; Explanation of Union Home Ministry



काय म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने?

त्रिपुरा या ठिकाणी मशिद बांधकामाला कोणतंही नुकसान पोहचलेलं नाही. असा कोणताही प्रकार त्रिपुरात घडलेला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मशीद पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र ही अफवा आहे आणि पूर्णपणे चुकीची माहिती आहे.

दर्गा बाजार परिसरातल्या मशिदीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केलं. हे सगळं चिंताजनक आहे.कुठल्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे अशी आग्रही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

FACT REVELED: Nothing happened in Tripura! ‘That’ news on social media is wrong; Violence worries Maharashtra; Explanation of Union Home Ministry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात