IND vs PAK : भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याची उत्कंठा, २४ ऑक्टोबरला खेळणारे ११ खेळाडू कोणते ?


वृत्तसंस्था

दुबई : टी २० वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आमनेसामने येतील. या सामन्याची उत्कंठा मोठी आहे. या सामन्यात भारताविरोधात पाकिस्तानचे कोणते खेळाडू मैदानात उतरणार आहेत, याची उत्सुकता अनेकांना आहे. Excitement of Pakistan’s match against India, Which of these 11 players will play on October 24?

भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे एक युद्धच असते. क्रिकेटर समोरासमोर येतात, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. चाहते या उत्कृष्ठ सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू कोण आहेत ते पाहूया.

बाबर आणि रिझवान सलामीवीर

कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान भारताविरुद्ध सलामीला येतील. दुसरीकडे, फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात तिघांनीही एकाच क्रमाने फलंदाजी केली होती. यानंतर अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज चौथ्या क्रमांकावर आणि शोएब मलिक पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील.



हे तीन खेळाडू फिनिशरची भूमिका बजावतील

फलंदाज आसिफ अली, अष्टपैलू इमाद वसीम आणि शादाब खान फिनिशरची भूमिका साकारतील. दुसरीकडे, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी वेगवान गोलंदाजी विभागात दिसतील.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम (कर्णधार ), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीफ रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

पाकिस्तानचा 15 जणांचा संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम कनिष्ठ, सरफराज अहमद (विकेटकीपर), शाहीन शाह आफ्रिदी आणि शोएब मलिक.

सामना किती वाजता

24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी ७.३० वाजता

Excitement of Pakistan’s match against India, Which of these 11 players will play on October 24?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात