पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : राष्ट्रपतींना काळजी पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यात त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवण्यात आली आणि उल्लंघन झाले. या मुद्द्यावरून गंभीर कायदेशीर हलचाली सुरू झाल्या असतानाच खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील काळजी व्यक्त केली आहे. Error in PM’s security: President worried Prime Minister Modi visits President !!

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रोटोकॉल नुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत आहेत. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपति भवनात पोहोचले असून त्यांची राष्ट्रपतींची चर्चा सुरू आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या फिरोजपूर दौऱ्यामध्ये त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळली. हुसैनीवालाच्या उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा 20 मिनिटे अडकून पडला होता. अखेरीस पंतप्रधानांनी फिरोजपूरचा दौरा रद्द करुन दिल्लीला माघारी येण्याचा निर्णय घेतला. यावरून देशभर राजकीय गदारोळ उठला आहे.



या राजकीय गदारोळात या पलिकडे काही गंभीर कायदेशीर हालचाली सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांनी याबाबत केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे देखील काही कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत आहेत.

Error in PM’s security: President worried Prime Minister Modi visits President !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात