Encounter between Naxals and security forces in Bijapur, Chhattisgarh, 5 jawans martyred

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी चकमक; सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद, 2 नक्षली ठार

Naxals : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीद सैनिक 3 डीजीजी आणि 2 कोब्रा असल्याची माहिती दिली जात आहे. याचदरम्यान दोन नक्षलवाद्यांनाही यमसदनी पाठवण्यात आले आहे. Encounter between Naxals and security forces in Bijapur, Chhattisgarh, 5 jawans martyred


विशेष प्रतिनिधी

विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीद सैनिक 3 डीजीजी आणि 2 कोब्रा असल्याची माहिती दिली जात आहे. याचदरम्यान दोन नक्षलवाद्यांनाही यमसदनी पाठवण्यात आले आहे. यात एका महिला नक्षलवादीचाही समावेश आहे. विजापूरमधील टेकुलगुडा भागात ही चकमकी उडाली. जवान आणि नक्षलवाद्यांच्या बाजूने प्रचंड गोळीबार सुरू आहे.

दुसरीकडे, छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे नक्षलवादी जनमिलीशियाच्या एक लाखांचे इनाम असलेल्या कमांडरने आत्मसमर्पण केले आहे. घरवापसीच्या मोहिमेमुळे प्रभावित होऊन नक्षलवादी कमांडरने एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. खून, जाळपोळ, दरोडा, आयईडी स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तो सहभागी होता. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 88 इनामी नक्षलवाद्यांसह 328 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

यापूर्वी 23 मार्च रोजी छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षकाचे (डीआरजी) तीन जवान नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात शहीद झाले होते. या हल्ल्यात डीआरजीचे पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले असून 10 जवान किरकोळ जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसला लक्ष्य केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसला धडक देताना शक्तिशाली आयईडी स्फोट झाला. कडनेर ते कन्हारगावदरम्यान डीआरजीचे 27 कर्मचारी जात असताना हा हल्ला झाला होता.

Encounter between Naxals and security forces in Bijapur, Chhattisgarh, 5 jawans martyred

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*