चर्चेतली निवडणूक; त्रिपुरातल्या आगरतळा महापालिकेत भाजपला बहुमत; तृणमूल काँग्रेस अस्वस्थ!!


वृत्तसंस्था

आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. त्यात दगडफेक होऊन दंगली झाल्या. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परंतु प्रत्यक्षात त्यावेळी त्रिपुरात काही घडलेच नव्हते. तरीदेखील त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचे प्रयत्न झाले. Election in question; BJP has majority in Agartala Municipal Corporation in Tripura; Trinamool Congress unwell !!

त्यानंतर त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय तृणमूल काँग्रेसने तापविला. ज्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला रस होता त्याच निवडणुकीत मतमोजणीमध्ये भाजप आघाडीवर दिसतो आहे. आगरतळा महापालिकेत 51 वॉर्डांपैकी 29 वॉर्डांमध्ये विजय नोंदवून भाजपने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत.मतदान झाले, त्याच दिवशी तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर या निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप करत मतमोजणी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने परिस्थितीची छाननी केल्यानंतर तृणमूल काँग्रेसची मागणी फेटाळली. आज प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. महत्त्वाच्या आगरतळा महापालिकेमध्ये भाजपने 51 जागांपैकी पैकी बॉर्डर पैकी 29 वॉर्ड जिंकत पूर्ण बहुमत मिळवले आहे.

त्यामुळे इथून पुढच्या काळात त्रिपुरामध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांची राजकीय लढाई कशी चालेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. या राजकीय लढाईत त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आमने सामने असणार आहेत.

Election in question; BJP has majority in Agartala Municipal Corporation in Tripura; Trinamool Congress unwell !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती