तृणमूल नेत्या सुजाता मंडल यांना निवडणूक आयोगाची नोटीस, दलितांविरुद्ध केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits

TMC leader Sujata Mandal : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचारसभा गाजवल्या. या कारणास्तव अलीकडेच आयोगाने भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निर्बंध घातले होते. निवडणूक आयोगाच्या रोषाची झळ ममता बॅनर्जी ते दिलीप घोष यांनाही बसली.

भिकाऱ्यांशी केली होती तुलना

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांनी काही दिवसांपूर्वी कथितरीत्या अनुसूचित जातीतील लोकांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. याविरुद्ध भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांच्या नेतृत्वात पक्षातील नेत्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने गत सोमसारी अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली आणि निवेदन सोपवून सुजाता मंडल यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात