Election Commission : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने आदेश काढले आहेत. मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. निकालानंतर कोणताही उमेदवार आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ दोनच लोकांसह जाऊ शकतो. Election Commission Bans Victory rally After Vote Counting On 2nd May in Five States Election
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने आदेश काढले आहेत. मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. निकालानंतर कोणताही उमेदवार आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ दोनच लोकांसह जाऊ शकतो.
तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी येत आहेत. बंगालमध्ये ७ टप्प्यांतील मतदान झाले आहे. अखेरच्या ८व्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. उर्वरित राज्यांतील निवडणुकीचे मतदान यापूर्वीच पार पडले आहे.
No victory procession after the counting on 2nd May shall be permissible. Not more than 2 persons shall be allowed to accompany the winning candidate or his/her authorised representative receive the certificate of election from the Returning Officer concerned: EC pic.twitter.com/fT3T3wvHUj — ANI (@ANI) April 27, 2021
No victory procession after the counting on 2nd May shall be permissible. Not more than 2 persons shall be allowed to accompany the winning candidate or his/her authorised representative receive the certificate of election from the Returning Officer concerned: EC pic.twitter.com/fT3T3wvHUj
— ANI (@ANI) April 27, 2021
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला फटकारले होते. मुख्य न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसर्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. २ मे रोजी मतमोजणी दिवसासाठी कोविड प्रोटोकॉल बनवून त्याचे अनुसरण करण्याचे त्यांनी आयोगाला बजावले. जर तसे झाले नाही तर आम्ही मतमोजणी बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोर्ट असेही म्हणाले होते की, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये. जेव्हा मोठमोठ्या सभा घेतल्या जात होत्या, तेव्हा आयोग काय परग्रहावर होता काय?, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला होता.
दरम्यान, कोरोनाच्या दुसर्या लाटेने भयंकर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या सभांमध्ये गर्दीबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. बंगालमधील ७व्या टप्प्यातील मतदानाआधी निवडणूक आयोगाने मोठे मोर्चे, रोड शो आणि पदयात्रेला बंदी घातली होती. राजकीय पक्षांना व्हर्च्युअल सभा घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Election Commission Bans Victory rally After Vote Counting On 2nd May in Five States Election
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App