आमने-सामने : आदित्य-मलिक-थोरात यांच्यात श्रेयाची स्पर्धा ; कोरोनाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात मोफत लसीकरणावरून आघाडीत ‘विस्फोट’ ; आदित्यचे ट्विट-डिलीट


  • एकीकडे कोरोना ने महाराष्ट्र होरपळून निघतो आहे तर दुसरीकडे राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. Face-to-face: A contest of credit between Aditya-Malik-Thorat

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीमध्ये राजकारण चांगलेच रंगले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं होतं . मात्र लगेचच राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची घोषणा केली.



त्यानंतर काही वेळातच कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्वीट केलं. “महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ पर्याय म्हणून नव्हे तर राज्य सरकारचं कर्तव्य म्हणून घेण्यात आला आहे. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे”.

राष्ट्रवादी आणि शिवसेना या विषयावर बोलल्यानंतर कॉंग्रेस पक्ष कसा मागे राहणार? यावर लगेच कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली.

“मोफत लस द्यावी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आग्रह होता. तो आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. याबाबतची चर्चाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. मुख्यमंत्री लवकरच हा निर्णय जाहीर करतील.

‘मोफत लस देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करत असतानाच, श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेस त्यावर नाराज आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट डिलीट केले. आदित्य ठाकरे यांनी मोफत लशीबद्दल केलेले ट्वीट काही वेळातचं ‘डिलीट’ करण्यात आलं. हे ट्वीट डिलीट केले म्हणजे कुछ तो गडबड है!

Face-to-face: A contest of credit between Aditya-Malik-Thorat

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात