झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेनांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; दोन एके 47 रायफली सापडल्याने खळबळ!!


वृत्तसंस्था

रांची : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बुधवारी बिहार विधानसभेत बहुमत चाचणी होण्यापूर्वीच ईडीने बिहारमध्ये छापेसत्र सुरू केले आहे. तसेच बिहारचे संलग्न राज्य असलेल्या झारखंडमध्ये देखील ईडीची कारवाई सुरू आहे.
ED raids on close associates of Chief Minister Hemant Soren in Jharkhand

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली, यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या छापेमारीदरम्यान दोन AK-47 रायफल्स मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ईडीच्या तपासणीत सापडल्या AK-47

बेकायदा खाण उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने 18 ते 20 ठिकाणी छापेमारी केली होती. झारखंडचे आमदार पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांच्या चौकशीनंतर ईडीकडून हा कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या छापेमारीदरम्यान प्रे प्रकाश यांच्या घरात दोन AK-47 रायफल्स सापडल्या आहेत. रांची येथील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकल्यानंतर कपाटात या रायफल्स सापडल्या असून सीआरपीएफने त्या जप्त केल्या आहेत.

कोण आहेत प्रेम प्रकाश?

प्रेम प्रकाश हे झारखंडच्या राजकारणातील एक मोठी असामी असल्याचे म्हटले जाते. झारखंडमधील नोकरशहा आणि राजकीय पक्षांमध्ये प्रेम प्रकाश यांची मजबूत पकड आहे. ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.

ED raids on close associates of Chief Minister Hemant Soren in Jharkhand

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!