ED Raids : झारखंड खाण घोटाळ्यात ईडीचे छापे; महिला आयएएस अधिकार्‍याकडे 25 कोटींचे घबाड!!

वृत्तसंस्था

रांची : झारखंड मधील खाण घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज महिला आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खनिज विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या घरावर तसेच अन्य 20 ठिकाणांवर छापे घातले. पूजा सिंघल यांच्या घरी तब्बल 25 कोटींची रोकड ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळून आली. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचे मशीनच मागवले, अशा बातम्या आल्या आहेत. ED raids in Jharkhand mining scam; Woman IAS officer loses Rs 25 crore

अर्थात हे छापे अजून सुरू असून ईडीचे अधिकारी याबाबतचे तपशील नंतर जाहीर करणार आहेत. झारखंडमधील दुसरे अधिकारी विनोद शर्मा यांच्या निवासस्थानावर देखील त्याच वेळी छापे घालण्यात आले आहेत.

दिल्ली, गुरुग्राम, धनबाद, रांची अशा विविध शहरांमध्ये एकाच वेळी 20 ठिकाणी छापे सुरू असल्याची माहिती आहे. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणावर खाण वाटप घोटाळ्यासंदर्भातील तसेच आधीच्या मनरेगा घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पूजा सिंघल या खनिज विभागाच्या सचिव होण्याच्या आधी मनरेगाच्या उपसचिव होत्या. त्या काळात त्यांच्यावर लाचखोरी केल्याचा आरोप आहे. आज ईडीने रांचीतील त्यांच्या घरावर छापा घातल्यानंतर त्याचे तब्बल 25 कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे. याबाबतचा तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत खुलासा करणार आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेच खाण विभागाचे मंत्री आहेत. ते आणि त्यांचे आमदार बंधू यांच्यावर ईडीची नजर आहे. खाण वाटपामध्ये या दोन्ही नेत्यांनी आपापल्या हितसंबंधीयांचा विचार करून त्यांना कंत्राटे मिळवून दिल्याचा ईडीला संशय आहे. “ऑफिस ऑफ प्रॉफिट” कायद्याचा हा भंग आहे, असे ईडीचे प्राथमिक निरीक्षण आहे. याबाबतची कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ED raids in Jharkhand mining scam; Woman IAS officer loses Rs 25 crore

महत्वाच्या बातम्या