Ed Raids : Vivo सह चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई; देशभरात 44 ठिकाणी छापे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी मोबाईल स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकाने चिनी कंपनीशी संबंधित चालू असलेल्या खटल्याच्या संदर्भात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये 44 ठिकाणी ED छापे घातले आहेत. Ed Raids: Big action on Chinese companies with Vivo

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ईडीने ही कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या ही छापेमारी सुरू असून आवश्यक कागदपत्रे तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे चिनी कंपन्या आधीच भारतीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. अशातच ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

यावर्षी मे महिन्यात ZTE कॉर्प आणि Vivo या चिनी कंपन्यांना आर्थिक अनियमिततेमुळे चौकशीला सामोरे जावे लागले होते. याशिवाय Xiaomi देखील तपासाच्या जाळ्यात अडकले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने चिनी कंपन्यांबाबत कठोर भूमिका घेऊन टिकटॉकसह 200 हून अधिक मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे.

Ed Raids: Big action on Chinese companies with Vivo

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती