भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, जागतिक बॅँकेने केले कौतुक, जीडीपी वाढीचा व्यक्त केला अंदाज


जगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने प्रशंसा केली आहे. भारताबाबतच्या अंदाजात सुधारणा करत जीडीपीमध्ये वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. The boom in the Indian economy, praised by the World Bank, projected GDP growth


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने प्रशंसा केली आहे. भारताबाबतच्या अंदाजात सुधारणा करत जीडीपीमध्ये वाढ होणार असल्याचे म्हटले आहे.

जागतिक बॅँकेच्या बुधवारी प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे की, खासगी खप आणि गुंतवणूक वाढल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी वाढ १०.१ टक्के होऊशकते. जानेवारीत जागतिक बॅँकेने वर्तवलेल्या ५.४ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा हा दुप्पटआकडा आहे. २०२१-२२ ची अनिश्चितता पाहता जागतिक बँकेने ७.५% ते १२.५% ची सीमाही सांगितली आहे.

२२ मार्चलाच फिच या रेटिंग संस्थेने २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत १२.८ टक्के ची मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. जागतिक बँकेने साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण आशियात भारत सर्वात मोठा देश आहे. २०२० मध्ये फक्त भारतात एफडीआय वाढली आहे. भारत आयटी कन्सल्टिंग आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डेटा प्रोसेसिंग सर्व्हिस आणि डिजिटल पेमेंटसह डिजिटल क्षेत्रात विक्रमी संख्येने करार आकर्षित करत आहे.

बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर यांच्या मते, भारताने पुन्हा मुसंडी मारली आहे. अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. लसीकरण सुरू झाले असून भारत लस उत्पादनात अग्रणी आहे. तथापि, कोरोना महामारीमुळे स्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. भारत पुन्हा रिकव्हर होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हे अलीकडेच समोर आलेला डेटा सांगतो. सर्वकाही चांगले राहिले तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपला वृद्धिदर दुहेरी आकड्यात राहील, अशी अपेक्षा आहे. विविध आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे.जागतिक महामारीच्या काळातही संसर्ग आणि मृत्यूचा कमी दर आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमामुळे निश्चितपणे ग्राहक आणि व्यवसाय या दोघांचाही आत्मविश्वास वाढेल, अशी अपेक्षा आहे. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, पण आता सध्याचे आर्थिक संकेत खूपच उत्साहवर्धक आहेत.

खप, गुंतवणूक आणि निर्यात वाढल्याने आगामी काही वर्षांत विकासाला प्रोत्साहन मिळेल. भारताकडे इंजिनिअर आणि आयटी टेक्नॉलॉजिस्ट यांचे टॅलेंट पूल आहे. तंत्रज्ञान अनेक अडथळ्यांवर कसे मात करते हे लॉकडाऊनने आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे भारतीय युवक आयटीशी संबंधित व्यवसाय, स्टार्टअप या क्षेत्रात प्रगती करत असल्याचे दिसेल. खासगी गुंतवणूकही वाढू शकते.

सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या सुधारणा आणि रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे आलेल्या उसळीमुळे आर्थिक रिकव्हरीत आणखी वाढ होऊ शकते. तरीही रिकव्हरीच्या मार्गात काही आव्हाने असू शकतात. भारताच्या बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातही मजबूत वाढ दिसेल. फक्त २०२१-२२ हे आर्थिक वर्षच नव्हे तर आगामी काही वर्षे भारताचीच असतील. भारत २०२४ पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. ३.७ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह भारत फ्रान्स आणि ब्रिटन या दोघांना मागे टाकेल.

The boom in the Indian economy, praised by the World Bank, projected GDP growth


आणखी बातम्या वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था