PM Kisan Sampada Yojana creates 5,30,500 jobs in the country

पंतप्रधान किसान संपदा योजनेतून देशात 5,30,500 रोजगारांची निर्मिती, शेतीच्या आधुनिकीकरणासह नासाडी कमी करण्यावर भर

PM Kisan Sampada Yojana : अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने फूड प्रोसेसिंग सेक्टरच्या परिपूर्ण विकासासाठी पंतप्रधान किसान संपदा योजना लागू केली आहे. आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना देणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी प्रधानमंत्री किसान संपदा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. PM Kisan Sampada Yojana creates 5,30,500 jobs in the country


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने फूड प्रोसेसिंग सेक्टरच्या परिपूर्ण विकासासाठी पंतप्रधान किसान संपदा योजना लागू केली आहे. आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना देणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी प्रधानमंत्री किसान संपदा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

5 लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती

PMKSY या योजनेमुळे देशात 5,30,500 थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे. दुसरीकडे, आणखी एक नवी योजना ऑपरेशन ग्रीन्सला PMKSY अंतर्गत नोव्हेंबर 2018 मध्ये 500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह लाँच करण्यात आले होते.

PMKSYच्या घटक योजना

 • मेगा फूड पार्क
 • इंटीग्रेटेड कोल्ड चेन आणि व्हॅल्यू अॅडिशन इन्फ्रास्ट्रक्चर
 • इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रो-प्रॉसेसिंग क्लस्टर
 • फूड प्रॉसेसिंग आणि प्रिझर्व्हेशन क्षमतेची निर्मिती आणि वाढ
 • बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजची निर्मिती
 • फूड सेफ्टी आणि क्वालिटी अॅश्योरेंस इन्फ्रास्ट्रक्चर
 • मानव संसाधन आणि संस्था
 • ऑपरेशन ग्रीन्स

काय आहे पंतप्रधान किसान संपदा योजना?

आधी या योजनेचे नाव कृषी समुद्री उत्‍पाद प्रसंस्करण आणि कृषी प्रसंस्‍करण क्‍लस्‍टर (Scheme for Agro-Marine Processing & Development of Agro-Processing Clusters) विकास ठेवण्यात आले होते. योजनेला 2017 मध्ये सरकारने मंजुरी दिली होती. शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे. उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादित मालाची ग्राहकांमध्ये पसंती निर्माण करणे, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रियेकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत.

PM Kisan Sampada Yojana creates 5,30,500 jobs in the country

महत्त्वाच्या बातम्या

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*