Tesla Cars India : टेस्लाने भारतात कारचे उत्पादन केले, तर आम्ही मदतच करू! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Tesla Cars India: Union Minister Gadkari tells Tesla - Start production in India as soon as possible!

Tesla Cars India : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक अमेरिकन कंपनी टेस्लाला (Tesla) भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे. सरकार ईव्ही उत्पादकांना देशात औद्योगिक क्लस्टर्स तयार करण्यास मदत करेल, अशी ग्वाही गडकरी यांनी टेस्लाला दिली. Tesla Cars India: Union Minister Gadkari tells Tesla – Start production in India as soon as possible!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक अमेरिकन कंपनी टेस्लाला (Tesla) भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे. सरकार ईव्ही उत्पादकांना देशात औद्योगिक क्लस्टर्स तयार करण्यास मदत करेल, अशी ग्वाही गडकरी यांनी टेस्लाला दिली.

इलेक्ट्रिक वाहनांवर भारत ज्या पद्धतीने लक्ष देत आहे, त्या दृष्टीने इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनी टेस्लासाठी येथे कारखाना उभारण्याची सुवर्णसंधी असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.

नितीन गडकरी गुरुवारी रायसीना संवाद 2021 मध्ये बोलत होते, तेथे त्यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटी, ईव्ही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीवरील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. गडकरी म्हणाले की, टेस्ला आधीपासूनच भारतातील उत्पादकांकडून भाग विकत घेत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांनी येथे कारखाना उभारणे ही सुवर्णसंधी ठरेल.

गडकरी म्हणाले, “मी (टेस्ला) त्यांना सूचित करतो की भारतात कारखाना सुरू करण्याची ही सुवर्णसंधी आहे. भारतीय बाजारपेठ टेस्लासाठी फायदेशीर ठरेल. इतर ठिकाणी उत्पादन करून भारतात विक्री करायची असेल तर त्याबाबत ते स्वतंत्र आहेत. परंतु त्यांनी येथे जर निर्मिती केली, आम्ही भारतात त्यांची मदत करू.

ते असेही म्हणाले की, टेस्ला औद्योगिक क्लस्टर तयार करू शकते आणि स्वतःचा ‘विक्रेता’ विकसित करू शकेल. गडकरी म्हणाले, “इतर देशांच्या तुलनेत येथून बरीच वाहने निर्यात केली जाऊ शकतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या हे व्यवहार्य ठरेल.” मंत्री म्हणाले की, टेस्लाचा प्रारंभिक टप्प्यात बंगळुरू, दिल्ली आणि मुंबई येथून विक्री सुरू करण्याचा मानस आहे.

ई-वाहनांवर सरकारचा विशेष भर असल्याचे गडकरी म्हणाले. येत्या पाच वर्षांत भारतात जगातील सर्वात मोठे ई-वाहन उत्पादक देश होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tesla Cars India : Union Minister Gadkari tells Tesla – Start production in India as soon as possible!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात