गुंतवणूकदारांचा ‘एसआयपी’वर पुन्हा वाढला विश्वास, मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात चक्क ९११५ कोटींची गुंतवणूक


विशेष प्रतिनिधी 

मुंबई – कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून दुरावलेला गुंतवणूकदार पुन्हा इक्विटी म्युच्युअल फंडाकडे परतला आहे. सरलेल्या मार्च महिन्यात ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडात तब्बल ९११५ कोटी रुपयांचा ओघ आल्याचे ‘ॲम्फी’च्या आकडेवारीवरून दिसून येते. म्युच्युअल फंड उद्योगासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. investor once again started SIP mutual fund

मध्यंतरीच्या काळात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’मधून (एसआयपी) बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदाराने पुन्हा यावर विश्वास दाखविल्याचे दिसते. प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. मार्चमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून ९१८२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी फेब्रुवारी २०२१ मध्ये ७५२८ कोटी रुपये होती. फेब्रुवारीतील ३.६२ कोटींच्या तुलनेत मार्चमध्ये ‘एसआयपी’ खात्यांची संख्या वाढून ३.७२ कोटींवर पोचली.



इक्विटी फंडांपैकी सेक्टोरल फंड आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (इएलएसएस) अर्थात टॅक्स सेव्हिंग्ज स्कीममध्ये मार्चमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे दिसून आले. या दोन प्रकारच्या फंडांत अनुक्रमे २००९ कोटी आणि १५५२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात अनेकजण कर वाचविण्यासाठी ‘इएलएसएस’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्याचा परिणाम यावेळी दिसून आला.

investor once again started SIP mutual fund

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात