सलग पाच दिवस सुरू असलेली निर्देशांकांमधील घसरगुंडीची मालिका थांबली, सेन्सेक्‍समध्ये 641 अंशांची वाढ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेले सलग पाच दिवस सुरू असलेली निर्देशांकांमधील घसरगुंडीची मालिका अखेर आज थांबली त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.Share Market recovers after five days

आज शेअऱ बाजारात दोन्ही निर्देशांक सव्वा टक्‍क्‍यापेक्षा जास्त वाढले. सेन्सेक्‍स 641 अंशांनी, तर निफ्टी 186 अंशांनी वाढला.सेन्सेक्‍सच्या 30 प्रमुख समभागांपैकी फक्त मारुती, टायटन, बजाज ऑटो, टेक महिंद्रा व लार्सन टुब्रो (बंद भाव 1411 रु.) यांचेच दर घसरले.बाकी सर्व 25 समभागांचे दर वाढले. यात हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स (2081 रु.), आयटीसी (223 रु.), अल्ट्राटेक सिमेंट आदींचा समावेश होता.सकाळी बाजार उघडताना निर्देशांक आजही घसरले होते;

मात्र नंतर पडलेल्या भावात खरेदी सुरू झाल्याने सेन्सेक्‍सने 50 हजारांच्या टप्प्यालाही स्पर्श केला होता; मात्र तेथे तो टिकू शकला नाही. दिवसअखेर सेन्सेक्‍स 49,858 अंशांवर; तर निफ्टी 14,744 अंशांवर स्थिरावला.

Share Market recovers after five days

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*