Economic Crisis Sri Lanka : श्रीलंकेत उपासमारीचे गंभीर संकट, चीनच्या कर्जामुळे आले हे दिवस, देश सोडून पलायनाच्या तयारीत नागरिक


श्रीलंका जवळपास 2.2 कोटी लोकसंख्येचा छोटा दक्षिण आशियाई देश. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तांदूळ, साखर, दूध पावडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अनेक पटींनी वाढत आहेत आणि लोक ते मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साखर 290 रुपये किलो आणि तांदूळ 500 रुपये किलोने विकले जात आहे. श्रीलंकेत परकीय चलनाची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. पेट्रोलच्या दरात 50 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 75 रुपयांनी वाढ झाली आहे.Economic Crisis Sri Lanka: Severe famine crisis in Sri Lanka, due to China’s debt these days, the situation is so bad that food prices have skyrocketed, citizens preparing to flee the country


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंका जवळपास 2.2 कोटी लोकसंख्येचा छोटा दक्षिण आशियाई देश. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तांदूळ, साखर, दूध पावडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अनेक पटींनी वाढत आहेत आणि लोक ते मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साखर 290 रुपये किलो आणि तांदूळ 500 रुपये किलोने विकले जात आहे. श्रीलंकेत परकीय चलनाची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. पेट्रोलच्या दरात 50 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 75 रुपयांनी वाढ झाली आहे.

जागतिक बँकेचा अंदाज आहे की, महामारी सुरू झाल्यापासून पाच दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. रोजगाराअभावी नागरिकांना देशही सोडावा लागत आहे. देशातील परकीय चलन संकटात पेट्रोलियमच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतून असे चित्र समोर आले होते की पेट्रोल खरेदीसाठी लोक पेट्रोल पंपावर तुटून पडले आणि लोकांना नियंत्रित करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. तेल खरेदीसाठी हजारो लोक तासनतास रांगेत उभे आहेत.



पेट्रोल खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या तीन वृद्धांचा शनिवारी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. देशातील डॉलरच्या तुटवड्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये विक्रमी 17.5 टक्क्यांसह किमती गगनाला भिडल्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, श्रीलंका आपल्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याचवेळी, एएनआयच्या अहवालात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने श्रीलंका सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमतीतही प्रचंड वाढ होत आहे. परकीय चलनाचा साठा 10 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आधीच देशात ‘आर्थिक आणीबाणी’ घोषित केली आहे, ज्यामुळे लष्कराला अन्नधान्य वाटपाचे विशेष अधिकारही दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कोलंबो बंदरावर जवळपास दोन आठवडे उभ्या असलेल्या डिझेल आणि विमान इंधनाच्या मालाची भरपाई करण्यासाठी त्यांनी शुक्रवारपर्यंत 42 दशलक्ष डॉलर्स उभे केले, कारण पैसे देण्यासाठी कोणतेही डॉलर नव्हते

कागद, शाईच्या तुटवड्यामुळे वर्तमानपत्र बंद, मुलांच्या परीक्षाही नाही

श्रीलंकेतील दोन प्रमुख वृत्तपत्रे कागदाअभावी आपली वर्तमानपत्रे बंद करत आहेत. खासगी मालकीच्या उपली वृत्तपत्राने सांगितले की, त्यांचे इंग्रजी भाषेतील दैनिक द आयलंड आणि त्याची सिंहली आवृत्ती दीवाना, केवळ न्यूजप्रिंटच्या कमतरतेमुळे ऑनलाइन उपलब्ध होईल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की श्रीलंकेतील तीस लाख शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, कारण अधिकाऱ्यांकडे परीक्षा घेण्यासाठी पुरेसे पेपर आणि शाई नाही. त्यामुळे सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे.

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट का झाली?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेवर संकट चीनकडून कर्ज घेतल्यामुळे ओढवले आहे. श्रीलंका चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीलंकेने चीनकडून एकूण 5 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. 2021 मध्ये चीनकडून आणखी 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. याशिवाय श्रीलंकेने भारत आणि जपानकडूनही कर्ज घेतले आहे. देशाला 7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 पर्यंत, श्रीलंकेवर 35 अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज होते, ज्यामध्ये चीनचा वाटा सुमारे 10 टक्के होता.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना आपल्या देशाला कर्जबाजारी करण्यासाठी मुख्यतः जबाबदार मानले जात आहेत. त्यांनी स्वतः चीनकडून मोठे कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे. श्रीलंकेने हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांना भाड्याने दिले आहे. काही वर्षांपूर्वी चीनच्या गुंतवणुकीच्या मदतीने हंबनटोटा येथे एक मोठा बंदर प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, चिनी कर्जाच्या साहाय्याने सुरू झालेला हा कोट्यवधी डॉलरचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला. प्रकल्प पूर्ण होत नव्हता आणि श्रीलंका चीनच्या कर्जाखाली दबला गेला.

2017 मध्ये झालेल्या करारानंतर श्रीलंकेने या बंदराचा 70 टक्के हिस्सा चीनला 99 वर्षांच्या लीजवर दिला, त्यानंतर चीनने पुन्हा त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. चीनकडून कर्ज घेतलेले देश परतफेड करू शकत नसताना त्यांच्या मालमत्तांवर अतिक्रमण केल्याचा आरोप चीनवर करण्यात आला आहे. मात्र, चीनने असे आरोप फेटाळून लावले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, सरकारने जाहीर केले की ते आपल्या बाह्य कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून बेलआउट मागतील. श्रीलंकेच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारत चीन आणि इतर देशांकडून अधिक कर्ज मागत आहे. श्रीलंकेला या वर्षीचे परकीय कर्ज फेडण्यासाठी सुमारे 7 बिलियन डॉलरची गरज आहे, तर देशाची परकीय गंगाजळी 2.3 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे, जी नोव्हेंबर 2019 मध्ये विद्यमान सरकार सत्तेवर आले तेव्हा 7.5 अब्ज डॉलरवर होती.

काय घडले असे?

वास्तविक, पर्यटन हे श्रीलंकेतील लोकांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. सुमारे पाच लाख श्रीलंकन नागरिकांचे पोट थेट पर्यटनावर अवलंबून आहेत, तर 20 लाख लोक अप्रत्यक्षपणे त्याच्याशी जोडले गेले आहेत. श्रीलंकेच्या GDP मध्ये पर्यटनाचा वाटा 10% आहे. श्रीलंकेला पर्यटनातून दरवर्षी सुमारे 5 अब्ज डॉलर किंवा विदेशी चलनात सुमारे 37 हजार कोटी रुपये मिळतात. 2019 मध्ये आणि नंतर 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना चीनकडून मोठ्या आशा होत्या, पण त्यांची निराशा झाली आहे. श्रीलंकेच्या नजरा आता भारतावर आहेत. श्रीलंका अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांकडून गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.

या संदर्भात गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना आश्‍वासन दिले की, भारत नेहमीच श्रीलंकेच्या पाठीशी एक मैत्रीपूर्ण शेजारी म्हणून उभा राहील. बासिल राजपक्षे यांनी श्रीलंकेला कठीण काळात केलेल्या मदतीबद्दल मोदींचे आभार मानले.

Economic Crisis Sri Lanka: Severe famine crisis in Sri Lanka, due to China’s debt these days, the situation is so bad that food prices have skyrocketed, citizens preparing to flee the country

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात