दस का दम! मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा अनोखा विक्रम ! भारतीय वंशाच्या एजाजपुढे भारतीय शेर ढेर; कुंबळेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी…


एका डावात 10 विकेट्स घेण्याचा दुर्मीळ विक्रम भारतीय वंशाच्या पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एझाझ पटेलने नावावर केला. असं करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. 1999 मध्ये भारताच्या अनिल कुंबळे यांनी दिल्लीत फिरोझशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध हा अनोखा विक्रम केला होता. कुंबळे यांची आकडेवारी होती 26.3-9-74-10 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत एझाझने हा विक्रम नावावर केला. 47.5-12-119-10  Dus ka dum! Mumbai-born Ejaz Patel’s unique record! Indian lions flock to Ejaz of Indian descent; Equivalent to Kumble’s world record …


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मुंबई म्हणजे भारतातील क्रिकेटचा बालेकिल्ला आहे. मुंबईने भारतासाठी एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. या खेळाडूंनी जगभरात जाऊन विरोधी संघाचा पराभव केला आहे. पण, आज याच मुंबईत जन्मलेला एक खेळाडू भारतीय संघासाठी घातक ठरला. न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाज पटेलने भारतीय फलंदाजांना त्यांचाच मैदानात धूळ चारली.

भारतीय वंशाच्या न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात विश्व विक्रम केला. त्याने भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या सर्वच्या सर्व म्हणजे १० फलंदाजांना बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्व फलंदाजांना बाद करणारा तो जगातील फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी भारताच्या अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध केली होती.

मयंक अग्रवालशिवाय एजाज पटेलची फिरकी भारताच्या एकाही फलंदाजाला समजू शकली नाही.

वानखेडे कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मयांक अगरवालच्या शतकाच्या बळावर 325 धावांची मजल मारली. परंतु जन्मभूमीत डावात 10 विकेट्स घेत एझाझने शनिवारचा दिवस गाजवला

कोण आहे एझाझ पटेल? जडेजासारखी ऍक्शन

एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत झाला. तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला गेले. त्याची अ‍ॅक्शन आणि देहबोली ही भारतीय स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजासारखी आहे. सामन्यादरम्यान एजाजने पाचवी विकेट घेतली तेव्हा त्याने मैदानावर डोके टेकवले. 9 टेस्ट, 7 ट्वेन्टी20 सामन्यात एझाझने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एझाझचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.

वेगवान गोलंदाज म्हणून एझाझने खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एझाझ फिरकी गोलंदाज झाला. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एझाझला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या कसोटीतच 7 विकेट्स घेत एझाझने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता.

Dus ka dum! Mumbai-born Ejaz Patel’s unique record! Indian lions flock to Ejaz of Indian descent; Equivalent to Kumble’s world record …

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण