विशेष प्रतिनिधी
दिल्ली : डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे एकूण 931 ऑक्सिजन प्रेशर स्विंग अँब्सॉर्पशन प्लान्टस देशामध्ये बसवण्यात आले आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या प्रसारामुळे तातडीने हे प्लान्स सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे प्लान्ट्स उभारण्यात आले आहेत, असे मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर डिफेन्स अजय भट्ट यांनी सोमवारी सांगितले आहे.
DRDO has set up 931 oxygen plants in the country
DRDO ने केले स्वदेशी मिसाइल Akash-NG आणि MPATGM चे यशस्वी परीक्षण, सैन्याची वाढणार ताकद
एकूण 869 जागी हे प्लान्टस प्रधानमंत्री केअर फंड मधून उभारण्यात आले आहेत. या प्लांट्स पैकी उत्तर प्रदेशमध्ये 103 प्लान्ट्स बसवण्यात आहेत. 62 तामिळनाडूमध्ये, 56 मध्यप्रदेशमध्ये, 49 वेस्ट बंगालमध्ये आणि राजस्थानमध्ये 48 प्लांट्स सुरू करण्यात आले, आहेत असे अजय भट्ट यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App