अफगाणिस्तानचा कोणत्याही राजकीय पक्षाने ध्रुवीकरणासाठी वापर करू नये – मान्यवरांचे आवाहन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील ताज्या घटनाक्रमाचा देशातील ध्रुवीकरणासाठी वापर होऊ देता कामा नये असे दिग्गजांच्या गटाने म्हटले आहे. माजी केंद्रीयमंत्री के. नटवरसिंग, यशवंत सिन्हा आणि मणिशंकर अय्यर आदी दिग्गजांचा या गटात समावेश आहे. केंद्र सरकारने सातत्याने तालिबानशी चर्चा करावी पण देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने याचा ध्रुवीकरणासाठी वापर करू नये म्हणून दक्षता घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे. Don’t use Afghanistan for polarizationभारताने तालिबानसोबत चर्चा केल्याबद्दल केंद्र सरकारचे स्वागत करताना या मान्यवरांनी भविष्यात देखील अशाच पद्धतीने चर्चा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अफगाणी नागरिकांना भारतामध्ये आश्रय देताना सापत्न वागणूक देण्यात येऊ नये. अफगाणिस्तानातील पत्रकार, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

या संकटाच्या काळात भारतातील लोकांनी अफगाणी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे गरजेचे आहे. आतापर्यंत प्रत्येक आक्रमकांना सडेतोड उत्तर देणारे अफगाणी नागरिक दहशतवादाविरोधातील लढाई देखील तितक्याच ताकदीने लढतील असा विश्वादस त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. हे निवेदनावर निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, माजी आयएएस अधिकारी आणि जामिया मिलियाचे माजी कुलगुरू नजीब जंग, अफगाणिस्तानबाबतचे तज्ज्ञ वेदप्रताप वैदिक, ज्येष्ठ पत्रकार सईद नक्वी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Don’t use Afghanistan for polarization

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण