संजय राऊत त्यांच्यासारख्या नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचे नसते, नितीश कुमार यांनी फटकारले


विशेष प्रतिनिधी

पाटणा: केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप पाठिंबा काढण्याचं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले होते. यावर अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचे नाही, असे म्हणत नितीश कुमार यांनी राऊत यांना फटकारले आहे.Doesn’t want to pay much attention to what leaders like Sanjay Raut say, Nitish Kumar slammed

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण आखले आहे. या धोरणाला नितीशकुमार यांचा विरोध आहे. यामुळे नितीशकुमार यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असं संजय राऊत यांनी ‘सामना’मधील लेखात म्हटलं होते.



नितीशकुमार यांचा जनता दरबार संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना रोखलं आणि संजय राऊत यांच्या आवाहनावर प्रश्न विचारण्यात आला. अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचं नाही, अशी बोचरी प्रतिक्रीया नितीशकुमार यांनी दिली.नितीश कुमार म्हणाले, संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आधी कुणासोबत होता आणि आता कुणासोबत आहे, हे सर्वांना दिसतंय. यामुळे अशा नेत्यांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मुंबईत मृत्यू झाला. त्यावेळी संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. यामुळे संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी फक्त कायदा करून उपयोग नाही. महिलांना शिक्षित करणं हा त्यावर मोठा उपाय आहे, याचा पुनरुच्चार नितीशकुमार यांनी केला. माज्याकेड यासंबंधी बिहारचा डाटा आहे. यानुसार महिलांच्या शिक्षण हाच लोकसंख्या नियंत्रणाचा एकमेव मार्ग आहे, असं नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं.

Doesn’t want to pay much attention to what leaders like Sanjay Raut say, Nitish Kumar slammed

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात