तामिळनाडूत लग्न सोहळ्यात मद्य वाटपासाठी सरकारच देणार विशेष परवाना, 7 दिवस आधी करावा लागेल अर्ज


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूमधील कोणत्याही खासगी कार्यक्रमात, कॉन्फरन्स हॉलमध्ये किंवा स्पोर्ट्स स्टेडियममध्ये आता मद्य विक्री केली जाऊ शकते. त्यासाठी राज्य सरकारने विशेष परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परवाना मिळवण्यासाठी 7 दिवस अगोदर अर्ज करावा लागतो. Distribution of liquor allowed in Tamil Nadu weddings

तामिळनाडू सरकारने विशेष प्रकारच्या मद्य परवान्याबाबत नोटीस जारी केली आहे. त्याच्या अधिसूचनेनुसार, कन्व्हेन्शन सेंटर, मॅरेज हॉल, स्पोर्ट्स स्टेडियम आणि होम फंक्शन्समध्ये दारू दिली जाऊ शकते. फक्त यासाठी होस्टकडे विशेष परवाना असावा.

किती काळ वैध असेल परवाना


मद्य घोटाळ्याचे आरोपी मनीष सिसोदियांचे तिहारमधून पत्र, मोदींच्या शिक्षणावर उपस्थित केले प्रश्न


मद्यासाठीचा हा विशेष परवाना अर्जात नमूद केलेल्या कालमर्यादेच्या आधारेच वैध असेल. ते फक्त एक किंवा काही दिवसांसाठी वैध असेल.

लायसन्स फी किती?

वेगवेगळ्या ठिकाणांनुसार परवाना शुल्कातही तफावत असणार आहे. महामंडळात होणाऱ्या पार्टीसाठी सर्वाधिक शुल्क आकारले जाणार आहेत. त्याचबरोबर पालिकेत थोडे कमी, तर इतर खासगी ठिकाणी कार्यक्रमासाठी सर्वात कमी शुल्क भरावे लागणार आहे.

महामंडळात आयोजित केलेल्या कोणत्याही पार्टीसाठी 11,000 प्रतिदिन भरावे लागतील जसे की – विवाह, कन्व्हेन्शन सेंटर, बँक्वेट हॉल.
आणि पालिकेत पार्टी करण्यासाठी 7,500 रुपये मोजावे लागतील.

Distribution of liquor allowed in Tamil Nadu weddings

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात