दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळविण्यासाठी दिव्यांगाचे प्रचंड हाल होतात. तासोनतास रांगेत थांबावे लागते. त्यांच्यासाही आता केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक राज्याला दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.Disabled people will get relief from the central government, now they will get the certificate online
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळविण्यासाठी दिव्यांगाचे प्रचंड हाल होतात. तासोनतास रांगेत थांबावे लागते.
त्यांच्यासाही आता केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक राज्याला दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देणं अनिवार्य असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने याबद्दलचा अध्यादेश जारी केला आहे. मंत्रालयाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्याचबरोबर मंत्रालयाच्या दिव्यांग विभागाने याबद्दलचं ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आता फक्त पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देणं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आता बंधनकारक असणार आहे. हा आदेश १ जूनपासून लागू होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही मागणी जोर धरु लागली होती. करोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे लागू केलेल्या विविध निबंर्धांमुळे दिव्यांगांना हे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रामुळे दिव्यांग नागरिकांना अनेक सरकारी सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App