National Monetization Pipeline; दिग्विजय सिंग यांची जीभ घसरली; भाजपला “नालायक बेटा” म्हणून झाले मोकळे!!


वृत्तसंस्था

भोपाळ : केंद्रातील मोदी सरकारच्या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन या धोरणावर टीका करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची जीभ घसरली आहे. ते भाजपला “नालायक बेटा” ठरवून मोकळे झाले आहेत. भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिग्विजय सिंग यांनी मोदी सरकारवर बेछूट टीका केली आहेDigvijay Singh’s tongue slipped; BJP was freed as an “incompetent island” !!.

सार्वजनिक क्षेत्रातल्या मालमत्तांचा खाजगी क्षेत्राला वापर आणि देखरेखीसाठी देऊन त्याचा उत्तम वापर करून त्यातून येणारा पैसा केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी राबविण्याची तयारी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन मध्ये आहे.संपूर्ण देशभरातून या धोरणातून सहा लाख कोटी रुपये उभे करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. मात्र काँग्रेसने या धोरणाचा अर्थ केंद्र सरकार सर्व सरकारी मालमत्ता विकत आहे, असा काढला असून त्यातूनच दिग्विजय सिंग यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले आहे.

ते म्हणाले की, मोदी तर म्हणतात, गेल्या 70 वर्षांमध्ये देशात काहीही झाले नाही. पण मग ते सध्या विकत आहेत काय? 1947 ते 2014 पर्यंत काँग्रेसने विविध योजना, विकास कामे यातून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मालमत्ता तयार केल्या. त्यांची विक्री मोदी सरकार करते आहे. हाच तर “नालायक बेटा” आणि “लायक बेटा” यांच्यातला फरक आहे.

लायक बेटा आपल्याला वारशात मिळालेल्या संपत्तीमध्ये, वस्तूंमध्ये भर घालतो. पण नालायक बेटा वारसा संपत्तीची विक्री करून कर्ज काढून मज्जा मारतो. हाच फरक काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. दिग्विजयसिंग यांच्या विधानावरून मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Digvijay Singh’s tongue slipped; BJP was freed as an “incompetent island” !!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण