खंडीत वीजपुरवठ्यामुळे धोनीची पत्नी साक्षी भडकली,


विशेष प्रतिनिधी

रांची : झारखंडमध्ये वषार्नुवर्षे विजेची समस्या का आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. राज्याची करदाता असल्याने मला हे जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी भारनियमनावर भडकली आहे.Dhoni’s wife witnesses power outage

आयपीएल सामन्यांमुळे धोनी महाराष्ट्रात आहे, तर साक्षी कुटुंबासह रांचीमध्ये आहे. रांचीसह संपूर्ण राज्यात विजेचा तुटवडा आहे. साक्षी धोनी सध्या झारखंडमधील वीज खंडित झाल्यामुळे हैराण आहे. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत तिने प्रश्न उपस्थित करत सरकारवर सडकून टीका केली आहे. साक्षी धोनीने सोमवारी ट्विटरवर रांचीमध्ये होत असलेल्या विजेच्या लपंडावाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली.



साक्षी यांनी म्हटले आहे की, झारखंडची करदाती म्हणून मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? आम्ही ऊर्जा वाचवत आहोत याची खात्री करून जबाबदारीने आमची भूमिका बजावत आहोत!

साक्षी धोनीने २०१९ मध्येही वीज संकटावर प्रश्न उपस्थित केले होते. रांचीच्या लोकांना दररोज वीज खंडित होण्याचा सामना करावा लागतो. दररोज चार ते सात तास वीजपुरवठा खंडित होतो. आज म्हणजेच १० सप्टेंबर २०१९ रोजी गेल्या पाच तासांपासून वीज नाही. आज हवामान योग्य असल्याने वीज खंडित होण्याचे कारण समजले नाही आणि आज सणही नाही. संबंधित अधिकारी या समस्येचे निराकरण करतील अशी आशा आहे,ह् असे साक्षीने म्हटले होते.

Dhoni wife witnesses power outage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात