Despite losing Nandigram, Mamata Banerjee has no problem to become CM Of West Bengal, know what the law says

नंदीग्राममध्ये पराभूत होऊनही ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री होण्यात काहीच अडचण नाही, जाणून घ्या, काय म्हणतो कायदा!

CM Of West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालात तृणमूल कॉंग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी जवळपास 1700 मतांनी त्यांचा पराभव केला. तथापि, ममता आणि त्यांच्या पक्षाने म्हटले आहे की, या निकालाविरोधात ते न्यायालयात दाद मागणार आहेत. तृणमूल सुप्रीमो ममता भलेही स्वत:च्या मतदारसंघात पराभूत झाल्या असतील, पण तरीही त्या मुख्यमंत्री होऊ शकतात, याविषयी कायद्यात काय तरतूद आहे, हे आपण येथे पाहणार आहोत. Despite losing Nandigram, Mamata Banerjee has no problem to become CM Of West Bengal, know what the law says!


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालात तृणमूल कॉंग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी जवळपास 1700 मतांनी त्यांचा पराभव केला. तथापि, ममता आणि त्यांच्या पक्षाने म्हटले आहे की, या निकालाविरोधात ते न्यायालयात दाद मागणार आहेत. तृणमूल सुप्रीमो ममता भलेही स्वत:च्या मतदारसंघात पराभूत झाल्या असतील, पण तरीही त्या मुख्यमंत्री होऊ शकतात, याविषयी कायद्यात काय तरतूद आहे, हे आपण येथे पाहणार आहोत.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 अन्वये त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. कलम 164 (4) नुसार, “एखादा मंत्री सलग सहा महिने राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य नसेल, तर त्याला पद सोडावे लागेल.” म्हणजे ममता बॅनर्जी यांना सहा महिन्यांत कोणत्याही विधानसभा जागेवरून निवडणूक जिंकावी लागेल. 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्या खासदारही होती. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. काही महिन्यांनंतर त्या भवानीपूरमधून निवडून आल्या.

कॉंग्रेसचे नेते आणि विधिज्ञ अभिषेक सिंघवी म्हणाले, “कायदेशीररीत्या आणि नैतिकरीत्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होण्यावर व सहा महिन्यांत निवडून येण्यावर कोणालाही आक्षेप नसला पाहिजे. जर कोणी हा मुद्दा बनवला, तर यावरून त्यांचे भारतीय संविधानाविषयी अज्ञान दिसेल.”

बंगालमध्ये तृणमूल सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. या विजयामुळे ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवरील गैरभाजप, बिगर-कॉंग्रेस गटात स्थान मिळाले आहे. संपूर्ण निवडणुकीत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना आव्हान देताना दिसल्या. ममता बॅनर्जी यांनी स्वतःला ‘बंगाल की बेटी’ म्हणून दाखवण्याच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले होती. यामुळे अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात कमी झाली.

Despite losing Nandigram, Mamata Banerjee has no problem to become CM Of West Bengal, know what the law says!

महत्त्वाच्या बातम्या