डेंग्यूवरचे औषध शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा; देशातील २० केंद्रावर चाचण्या घेण्यात येणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डेंग्यूवरचे प्रभावी औषध शोधल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला असून या औषधांची चाचणी देशातील २० केंद्रावर केली जाणार आहे. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊच्या शास्त्रज्ञांनी डेंग्यूवरचे औषध तयार केले आहे. या औषधाचा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपयोग केला जाईल. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाली तर मृत्यू होऊ शकतो. डेंग्यूला हाडतापदेखील म्हणतात. कारण, डेंग्यूमध्ये रुग्णाच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात. आतापर्यंत डेंग्यूवर कोणताही इलाज नाही. लक्षणांच्या आधारे त्यावर उपचार केले जातात, पण आता शास्त्रज्ञांना त्याचे उपचार सापडले आहेत. Dengue Fever: Big News! Scientists have found a drug for dengue, which will soon be tested at 20 centers

औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू

डेंग्यूच्या औषधांची क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या जाणार आहेत. हे औषध देशातील २० केंद्रांवर १० हजार डेंग्यू रुग्णांना दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर १०० रुग्णांना ट्रायलमध्ये ठेवण्यात येईल आणि त्यांना हे औषध देण्यात येईल. मुंबईतील औषध कंपनीने हे औषध तयार केले आहे.



अँटी व्हायरल औषध

शास्त्रज्ञांच्या मते, डेंग्यूचे हे औषध वनस्पतींवर आधारित आहे. त्याला ‘क्युक्युलस हिरसूटसचे शुद्धीकृत जलीय अर्क’ असे म्हटले जात आहे. हे अँटी व्हायरल औषध असून औषधाचे उंदीरांवरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मिळाली आहे.

Dengue Fever: Big News! Scientists have found a drug for dengue, which will soon be tested at 20 centers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात