विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात डेंगीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल २६३ रुग्णांची नोंद झाली, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.डेंगीचा नवा प्रकार प्रामुख्याने मथुरा आणि आग्र्यामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्या दोन शहरांत घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे. Dengi fever increased in UP
गाझियाबादमध्येही तापाचे रुग्ण वाढल्याने दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत फिरोजाबादमध्ये डेंगीमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य आरोग्यविभागाने म्हटले आहे.उत्तर प्रदेशात डेंगीचा नवा प्रकार `डी-२` आढळून आला आहे.
आयसीएमआरने ही माहिती दिली आहे. डेंगीच्या नव्या रुग्णांपैकी १७० रुग्ण हे एकट्या फिरोजाबादमधील आहेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १९०० जणांना डेंगी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App