दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली जस्ट डायल सेक्स रॅकेट चालवत आहे, दिल्ली महिला आयोगाचे आरोप


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : जस्ट डायल हे भारतातील एक सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. दिल्ली महिला आयोगाने जस्ट डायल या सर्च इंजिन विरुद्ध वेश्या व्यवसायास प्रेरणा दिल्याचा आरोप करत नोटिस पाठवली आहे. स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लोकांविरूध्द एफआयआर करण्याची मागणीदेखील दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला नोटीस देऊन केली आहे.

Delhi Women’s Commission alleges Just Dial is running a sex racket under the name of spa and massage center in Delhi

या प्रकरणा संदर्भात जस्ट डायल मधील अधिकाऱ्यांनी कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. तसेच कोणत्याही कॉल्स आणि मेसेजेसना त्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जस्ट डायल या कंपनीला पाठवण्यात आलेल्या नोटिसला त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर त्यांची चौकशी केली जाईल.


ओरिसातील सेक्स रॅकेटवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक, गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी


जस्ट डायलला जारी केलेल्या समन्समध्ये दिल्ली महिला आयोगाने असा दावा केला आहे की, त्यांच्या टीमने दिल्लीतील स्पा सेंटरचा तपशील मिळविण्यासाठी कॉल करून चौकशी केली होती. 24 तासांच्या कालावधीत वेगवेगळ्या नंबरवरून एकूण 32 व्हॉट्सअॅप मेसेजेस आणि 15 कॉल्स आले होते. प्राप्त झालेल्या जवळपास सर्व कॉल्स आणि मॅसेजेसमध्ये मुलींचे फोटो व त्यांच्या सेवांचे रेट शेअर केले गेले होते. एकूण 150 मुलींचे फोटो या इथं शेअर केले गेले होते. असा खळबळजनक दावा दिल्ली महिला आयोगाने केलेला आहे.

अधिकारयांनी चौकशी केल्यानंतर स्पा सेंटर्स हे लैंगिक व्यवसायांसाठी वापरले जात आहेत अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाने जस्ट डायल या कंपनीला त्यांच्या दिल्लीतील एकूण स्पा सेंटर्सची माहिती तसेच सेक्स रॅकेट चालवणार्याची यादी देण्यास सांगितले आहे.

दिल्ली महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना देखील कंपनीच्या विरोधात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Delhi Women’s Commission alleges Just Dial is running a sex racket under the name of spa and massage center in Delhi

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात