ओरिसातील सेक्स रॅकेटवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक, गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ओडीशातील शिक्षिकेचे अपहरण आणि मृत्युप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. नड्डा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.BJP demands resignation of odisa HM on sex racket

समितीत लोकसभेच्या खासदार सुनीता दुग्गल, भाजपच्या महिला शाखेच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन आणि आमदार रुप्रा मित्रा यांचा समावेश आहे. हे सदस्य घटनास्थळी जातील. स्थानिकांकडून माहिती घेऊन ते नड्डा यांना सविस्तर अहवाल सादर करतील.



याप्रकरणी गृह मंत्री दिब्याशंकर मिश्रा यांचा हात असल्याचा भाजप महिला मोर्चाचा आरोप असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे भाजप महिला मोर्चाने केली आहे.

कालाहंडी लोकसभा मतदारसंघातील जुनागड विधानसभा क्षेत्राच्या महालिंग विभागात घडलेल्या या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या महिन्याच्या प्रारंभी २४ वर्षीय शिक्षिका मामिता मेहेर यांचा अर्धवट जळालेला मृतदेह कालाहंडीमधील स्टेडियजवळील खड्यात आढळला.

शाळेतील मुलींना परिक्षेत चांगले गुण देण्याचे आमिष दाखवून गोबिंद साहू त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ओढायचा असा आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या आवारातच सेक्स रॅकेट चालविले जायचे. गृह मंत्र्यांचाच वरदहस्त असल्यामुळे हे प्रकार सर्रास सुरु होते, असाही आरोप करण्यात आला.

BJP demands resignation of odisa HM on sex racket

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात