आगीत १०५ दुकाने जळून खाक झाली आहेत.या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.Delhi: Massive fire at Lajpat Rai Market at Chandni Chowk; 105 shops burned
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील चांदणी चौकातील लजपत राय मार्केटमध्ये आज भीषण आग लागली आहे.आगीत 105 दुकाने जळून खाक झाली आहेत.या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे पर्यंत सुरु आहेत.दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.परंतु आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
दिल्ली: चांदनी चौक की लाजपत राय मार्केट में आग लग गई, दमकल की 12 गाड़ियां आग पर काबू पाने की कोशिश कर रही हैं। pic.twitter.com/16EygcfmK7 — ANI_HindiNews (@AHindinews) January 6, 2022
दिल्ली: चांदनी चौक की लाजपत राय मार्केट में आग लग गई, दमकल की 12 गाड़ियां आग पर काबू पाने की कोशिश कर रही हैं। pic.twitter.com/16EygcfmK7
— ANI_HindiNews (@AHindinews) January 6, 2022
दिल्ली अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी राजेश शुक्ला यांनी सांगितले की, ‘एकूण 105 दुकाने पेटले आहेत, या भागाला तेह बाजारी म्हणतात. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.आग विझवण्यात आली असून कूलिंगचे काम सद्या सुरु आहे.तसेच आगीची माहिती पहाटे 5.45च्या सुमारास मिळाली. या अपघातात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App