Ahmednagar Hospital Fire: भय इथले संपत नाही ! आईला वाचवलं पण माझ्या डोळ्यासमोर वडिलांनी जीव सोडला…आपबिती ….हृदयद्रावक कहाण्या…


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आग लागली . रुग्णालयाच्या कोविड विभागातील आयसीयुमध्ये लागलेल्या या आगीत काही मिनिटांत 11 रुग्णांचा मृत्यू झाला. आगीचं स्वरूप भीषण असल्यानं रुग्णांना बाहेर काढेपर्यंतच या अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता.या धक्कादायक घटनेत काही लोकांनी डोळ्यासमोर आपल्या उपचार घेत असलेल्या नातलगांना गमावलं. यातील कडूबाळ गंगाधर खाटीक यांचा डोळ्या समोर मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विवेक खाटीकने दिली. Ahmednagar Hospital Fire: Fear does not end here! I saved my mother but my father died in front of my eyes … Apabiti …. Heartbreaking stories …

जिल्हा रुग्णालयात लागलेल्या या आगीच्या घटनेचा विवेक प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आपल्या वडिलांचा या आगीत मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना त्यांनं स्वत: सांगितली. “मागच्या गुरूवारी वडिलांना कोविडच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केलं होतं. वडिलांच्या सोबत मी आणि माझी आई सुद्धा इथेच होतो. आज सकाळी ही घटना घडली त्यावेळी मी रुग्णालयाच्या बाहेर आलेलो होतो. आगीची घटना कळताच मी धावत मध्ये गेलो. वडीलांना आयसीयु बेडवर ठेवलं असल्यानं मला त्यांना लगेच उचलता आलं नाही. म्हणून मी आधी आईला बाहेर घेऊन आलो.आग दिसत असल्यानं मी येताना माझा शर्ट काढून वडिलांच्या अंगावर टाकला. आईला बाहेर सोडून आलो तेव्हा डोळ्यासमोर जे होतं ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यापासून १०-१५ फूटावर वडिल त्या आगीमध्ये भाजले जात होते. आग मोठी असल्यानं भरपूर धुर झाला होता, त्यामुळं मला काहीच करता आलं नाही. माझ्यासमोर सगळं होत्याचं नव्हतं झालं” अशी भावना यावेळी विवेकनं व्यक्त केली. पुढे त्यानं पुन्हा एकदा बोलून दाखवलं की, मी आईला वाचवलं पण वडिलांना वाचवता आलं नाही याची आयुष्यात खंत राहील. जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या या आगीमध्ये ज्या 11 रुणांचा मृत्यू झाला, त्या सर्वांच्या अशाच हृदयद्रावक कहाण्या आहेत.

Ahmednagar Hospital Fire : Fear does not end here! I saved my mother but my father died in front of my eyes … Apabiti …. Heartbreaking stories

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण